Ad will apear here
Next
सरदार वल्लभभाई पटेल – भारताचा पोलादी पुरुष
‘सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते. सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने तुम्ही एवढे नेभळट बनाल, की अन्यायाशी लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही. व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात,’ असे सरदार वल्लभभाई पटेल म्हणत.

सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्त्व! देशातील ५६५ संस्थाने विलीन करून घेऊन सामर्थ्यशाली एकसंध भारत उभा करणे हे पटेलांचे महत्त्वाचे योगदान म्हणता येईल. ‘सरदार वल्लभभाई पटेल : भारताचा पोलादी पुरुष’ हे रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक त्यावर प्रकाश टाकते.

सुप्रसिद्ध व ज्येष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी या पोलादी पुरुषाचा संपूर्ण जीवनपटच अत्यंत ताकदीने या पुस्तकाद्वारे उभा केला आहे. पटेलांचे बालपण, त्यांचा राजकारणातला प्रवेश, गांधीजींबद्दलची त्यांची आस्था, नेहरूंसोबतचे त्यांचे मित्रत्वाचे नाते, तसेच त्यांच्यासोबतचे मतभेद, संस्थानिकांबरोबरच्या वाटाघाटी व संस्थानांचे यशस्वी विलीनीकरण, पटेलांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम व कठोर निर्णय, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू असा या पुस्तकाचा मोठा आवाका आहे.

एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व उलगडून दाखवणारे हे चरित्र वाचकांना निश्चितच रोमहर्षक व प्रेरणादायी वाटेल. अशा प्रकारचे हे एकमेव चरित्र असल्याचा विश्वास लेखक व प्रकाशकांना वाटतो.

पुस्तक : सरदार वल्लभभाई पटेल : भारताचा पोलादी पुरुष
लेखक : बलराज कृष्णा
प्रकाशन : रोहन प्रकाशन
पृष्ठे : ३४४
मूल्य : ३४० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZJUBT
Similar Posts
सरदार वल्लभभाई पटेल – भारताचा पोलादी पुरुष देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि भारताचे पोलादी पुरुष अशी ओळख असलेले राजकीय नेते सरदार वल्लभभाई पटेल यांची ३१ ऑक्टोबर ही जयंती. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दलच्या दोन पुस्तकांचा हा अल्प परिचय...
शौर्यगाथा, परमवीर-गाथा शूर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी मेजर जनरल शुभी सूद यांनी त्यांच्या गाथा पुस्तकबद्ध केल्या आहेत. शौर्यगाथा या पुस्तकात त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध, कारगिल युद्ध, शांतता काळातील पुरस्कार असे विभाग केले आहेत. सुभेदार किशनवीर नागरकोटी, खुदादखान आदींच्या पराक्रमाची माहिती मिळते
छत्रपती शिवाजी महाराज महाप्रतापशाली शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृ. अ. केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती १९०६मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याची नववी आवृत्ती वाचकांसाठी सध्या उपलब्ध आहे.
कलामांचं बालपण उत्तम शिक्षक, बुद्धिमान शास्त्रज्ञ, मिसाइल मॅन, महान राष्ट्रपती अशी सर्व विशेषणे लागू होणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ. एपीजे अब्दुल कलाम. त्यांच्यासारखी महान व्यक्ती कशी घडत गेली हे ‘कलमांचे बालपण’मधून सांगताना सृजनपाल सिंग यांनी छोट्या कलामचे भावविश्व, उलगडले आहे. त्यांच्या लहानपणीच्या अनेक रंजक गोष्टी यात आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language